TRENDING:

नगरसेवक झाली, विजयी होताच घडला गुन्हा, मंत्र्याच्या मुलीवर FIR दाखल होणार?

Last Updated:

नगरसेवक पदाची निवडणूक जिंकताच एका मंत्र्याच्या मुलीकडून आणि तिच्या काही सहकाऱ्यांकडून गुन्हा घडला आहे. या प्रकरणी काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: शुक्रवारी १६ जानेवारीला राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. अनेक महानगर पालिकांमध्ये महायुतीची सत्ता आली. या निवडणुकीत विविध मंत्र्यांची, आमदारांची आणि बड्या राजकीय नेत्यांची मुलं निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील काहींचा पराभव झाला तर बहुतांशी उमेदवारांचा विजय झाला. पण नगरसेवक पदाची निवडणूक जिंकताच एका मंत्र्याच्या मुलीकडून आणि तिच्या काही सहकाऱ्यांकडून गुन्हा घडला आहे. या प्रकरणी काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण संबंधित मंत्र्यांच्या मुलीवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
News18
News18
advertisement

हर्षदा शिरसाट असं गुन्हा दाखल होण्याची शक्यता असलेल्या मंत्र्याच्या मुलीचं नाव आहे. त्या सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या आहेत. महापालिकेत विजय झाल्यानंतर शहरात जल्लोष सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी भररस्त्यात तलवारी नाचवत कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनीही विजय मिरवणुकीत तलवार फिरवल्याने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

नेमका प्रकार काय?

महानगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवल्यानंतर शहरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी गुलाल उधळत असतानाच काही लोकप्रतिनिधींनी हातात तलवारी घेतल्या. हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजीत जीवनवाल यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारी नाचवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकावर गुन्हा, मग दुसऱ्यावर का नाही?

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अभिजीत जीवनवाल याच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याच मिरवणुकीत तलवार फिरवणाऱ्या हर्षदा शिरसाट यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. "एका उमेदवारावर गुन्हा दाखल होतो, मग पालकमंत्र्यांच्या मुलीवरही गुन्हा दाखल होणार का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

advertisement

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याने केले हाल, विक्रीतून लागवडी खर्चही नाही निघाला, शेतकरी हवालदिल
सर्व पहा

सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यातच सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींकडून असे कृत्य झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पालकमंत्र्यांच्या मुलीचा तलवार फिरवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरसेवक झाली, विजयी होताच घडला गुन्हा, मंत्र्याच्या मुलीवर FIR दाखल होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल