TRENDING:

विमानात दोष तरी केलं उड्डाण? अजित पवारांच्या विमानाबाबत मोठी अपडेट, अमेरिकन कंपनीने केलं होत अलर्ट

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते. पण विमान लँडिंग करत असताना विमानाला अपघात होऊन अजित पवारांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विमानात दोष होता का? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कारण या विमानाच्या मॉडेलबद्दल आधीच अमेरिकन कंपनीने अलर्ट केलं होतं.
News18
News18
advertisement

या विमान अपघातप्रकरणी DGCA सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमकं कारण सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांनी वापरलेल्या Learjet प्रकारच्या विमानांमध्ये यापूर्वीही लँडिंग गिअर संदर्भातील तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने (NTSB) नुकतीच एक तातडीची सुरक्षा शिफारस जारी केली होती. या शिफारशीत फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे (FAA) काही Learjet मॉडेल्सच्या मुख्य लँडिंग गिअरची तत्काळ तपासणी बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती.

advertisement

लँडींग गिअर बाबत आधीच अमेरिकन संस्थेनं तपासणीचे आदेश दिले होते. त्यामुळे अजित पवारांनी वापरलेल्या विमानात देखील अशाच तांत्रिक बिघाड होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब केला नसला तरी अमेरिकन कंपनीने जारी केलेला अलर्ट आणि त्यानंतर या विमानाचा झालेला अपघात पाहता, या विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

advertisement

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?

एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.

advertisement

दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.

ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.

advertisement

अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.

विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?

खासगी VSR कंपनीचे विमान

एकूण प्रवासी 05

1. माननीय अजित दादा पवार साहेब

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर

4. कॅप्टन संभवी पाठक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हेल्मेट न घातल्याची चूक, गुप्ता यांनी घेतला धडा, आता करतात हे काम
सर्व पहा

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमानात दोष तरी केलं उड्डाण? अजित पवारांच्या विमानाबाबत मोठी अपडेट, अमेरिकन कंपनीने केलं होत अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल