पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे. शहरातील जनता करियर लाँचर नामक खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नीट परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्याने या निवासी संस्थेत प्रवेश घेतला होता. शहरालगतच्या धानोरा या गावातील रहिवासी 17 वर्षीय मुलाने खोलीतील पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याने आपल्या पालकांना संस्थेतील कर्मचारी त्रास देत असल्याविषयी माहिती दिली होती.
advertisement
संध्याकाळी घडली घटना
ही घटना आज संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. १७ वर्षीय मुलाने जनता लॉन्चर येथील वरच्या मजल्यावर राहत असलेल्या ठिकाणी नायलोन दोरीन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती मिळाल्याने रामनगर पोलीस घटणास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.
हॉस्टेलमध्ये मुलाला त्रास
त्यानंतर पोलीस स्टेशन रामनगर इथं मयत मुलाचे वडील गुलाब विठुजी सुदरी यांनी तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, आपला १७ वर्षे मुलगा याने हॉस्टेलचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत आहे. त्याची मनस्थिती बरोबर वाटत नाही, परंतु त्याला आम्ही समजावून सांगितलं की, तू व्यवस्थित राहा आम्ही त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही' असं सांगत मृत मुलाच्या वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
या प्रकरणी हॉस्टेलचे वॉर्डन लक्ष्मन रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटींग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे आणि प्राचार्य आशिष किष्णाजी महातळे यांच्या विरुद्ध कलम 107,3 (5) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करत आहे.
