गेल्या महिन्यापासून कोल्हापूर महानगर पालिकेने लाखो घरांची सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणामध्ये डेंगी डासांच्या आळ्या मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत, तर डेंगीचे 58 रुग्ण आढळलेले आहेत. ही संख्या तशी धोक्याची घंटा असून पावसाचा जोर ओसरला की, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आशा सेविकांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहर आणि परिसरात सर्व्हे सुरू केलेला आहे.
advertisement
कसा केला जातो सर्वे?
महापालिकेच्या १५० आशा वर्कर्सच्या माध्यमातून शहर आणि परिसरातील घरांना दिल्या जात आहेत. भेटी
भेटी दरम्यान त्यांच्या घरासमोरील अंगणात, फ्रिजमध्ये तसंच साठवलेल्या पाण्याची केली जात आहे, पाहणी
डेंगीच्या आळ्या आढळणाऱ्या घरांमधील नागरिकांचे प्रबोधन केलं जात आहे. तर नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात असून त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महिनाभरात पालिकेने चालवलेल्या सर्वेक्षणात तब्बल दीड लाखाहून अधिक घरांची तपासणी करण्यात आलेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात डेंगी डासांच्या आळ्या सापडणारी ठिकाणे वाढली आहेत. हा वाढता आलेख म्हणजे आगामी काळात डेंगीचा धोका दाखवत आहे. हा धोका ओळखून ज्यांना ताप आहे, अशा रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे प्रमाण जूनमध्ये वाढले. जूनमध्ये एकूण 181 रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठवले. त्यात 22 रुग्ण डेंगीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात असे एकूण 58 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिली.
महानगरपालिकेने शहर आणि परिसरात केलेल्या तपासणीमध्ये डेंगी बरोबर चिकून गुनिया तसंच स्वाईन फ्लूचे ही रुग्ण आढळले आहेत. सहा महिन्यात स्वाईन फ्लूचे 14 रुग्ण आढळले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये रोगराई वाढू नये, तसंच झोपडपट्ट्यांमध्ये या रोगराईतून कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असून यावर्षी पहिल्यांदाच रोगाच्या पूर्वी इलाज हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
