TRENDING:

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता, हडपसर-यवत रस्त्याबाबतही फडणवीसांचा मोठा निर्णय

Last Updated:

पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या आखणीस मान्यता देण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : नागपूर- चंद्रपूर द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील घाटकोपर पूर्व, चेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

सुधारित आखणीनंतर नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गात बदल

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सेलडोह इंटरचेंज ते दुर्ग हैदराबाद महामार्गावरील नवेगाव (मोर)पर्यंत महामार्ग बांधण्यात येणार आहे. याची लांबी 192 किलोमीटर असणार आहे. तसेच 11 किलोमीटर लांबीचा चंद्रपूर जोड रस्ता पूर्वीच्या आखणीनुसार कायम ठेवण्यात आला आहे. अशा एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मान्यता देण्यात आली आहे. सुधारित रस्ता आखणीमुळे 27 हेक्टर वन क्षेत्र संपादनात बचत होणार आहे.

advertisement

पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत वाहतूक कोंडीवर उतारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरताय? तर आताच थांबा ही सवय,डॉक्टरांनी दिला सल्ला
सर्व पहा

राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून मान्यता घ्यावी. प्रत्येक प्रकल्प गतिशक्ती पोर्टलकडून मान्यता आल्यानंतरच समितीच्या बैठकीसमोर यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता, हडपसर-यवत रस्त्याबाबतही फडणवीसांचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल