अजित पवार यांच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांपासून दूर गेले होते. मात्र अजित पवार दूर होतात जयंत पाटलांमुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो असल्याचे अप्रत्यक्षपणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
अजित पवार यांचे नाव न घेताच त्यांच्याच कात्रीमुळे सोलापूर जिल्ह्याची आणि राष्ट्रवादी पक्षाची वाट लागली असल्याचेही खासदार मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या सत्कार वेळी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.
advertisement
मोहिते पाटील कुटुंबीय लोकसभेवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत
मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात रान उठवून २०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. राज्यातही आघाडी सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून, त्यांच्या सहकारी संस्थांमधल्या कारभारावर आरोप करू सत्ताधाऱ्यांनी त्यांनी सत्तापक्षात सहभागी करून घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते, सहकारधुरीण भाजपमध्ये सहभागी झाले. यात काळात अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबीय भाजपमध्ये गेले. भाजपनेही रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केले. परंतु विजयसिंह दादा मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काहीही करून लोकसभा लढवायची, असा चंग बांधला. त्यावेळी भाजप नाईलाज झाल्याने मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोहिते पाटील यांच्या प्रमाणे स्थानिक पातळीवर तेव्हा राजकीय कारणांतून, उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये संघर्ष झाला, त्यावेळी अनेक नेतेमंडळींनी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेला वेगळा रस्ता निवडला.