बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून धनंजय मुंडे बोलत होते. आमचं घरदार काढलं,काहीच ठेवलं नाही. आता माझ्या चष्म्याची पण अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा, वोपून दिसेल की नाही माहित नाही. पण त्यांना (मनोज जरांगे) वाटत असेल पण आपण एक वाचाळ आहे, तर तरं समजायचं कारण नाही,असा स्पष्ट संदेश धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिला.
advertisement
मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचे 10 टक्क्याचं घ्यावं आमचा काही विरोध नाही. आम्ही सोबत आहोत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा समाजासाठी लढलो आहे सर्व जातीसाठी लढलो आहे. पण आमच्या ताटातल कोण घेत असेल तर आम्ही नुसतं बघत बसणार नाही,असा इशारा धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.
कुणाला घाबरायचं नाही, कुणी अंगावर आला तर शिंगावर घ्यायचा.दसरा मेळाला संपताच ते (मनोज जरांगे) म्हणाले, धनगरांचा 94 चा जीआर रद्द करा. पण याला जीआर तरी कळतो, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी जरांगेची खिल्ली उडवली.
मराठा समाजातील गरिबातील गरीबाचा फायदा करायचा असेल तर त्यांनी ईडब्ल्युएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादी लागताय. तसेच आपण लय वाचाळ आहोत,असे समजायला कारण नाही, अंगावर आले तरी आम्ही देखील शिंगावर घेऊ असा इशारा धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.