सध्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका सभेत बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केला होता.मी बारा गावचा पाटील आहे असं म्हणत राणा पाटील यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली होती. राणा जगजितसिंह यांच्या या टीकेवर ओमराजे निंबाळकरांनी बोचऱ्या शब्दात पलटवार केलाय. राणा जगजितसिंह यांचा समाचार घेत असतानच ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा लेक मल्हार पाटीलवरही निशाणा साधला आहे. मल्हार पाटील यांनी एका सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल या निशाणीचा आईस्क्रिमचा कोन अशा शब्दात हेटाळणी केली होती, त्यावर ओमराजेंनी हल्ला चढवला आहे.
advertisement
जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं
धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पिढ्यान् पिढ्या राजकीय आणि कौटुंबिक वाद धुमसत आहे. सध्या निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जहरी टीका केली जाते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालंय..
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही
