धाराशिव : अनेक जण नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचे ठरवतात आणि त्यात आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणे काम करत यशही मिळवतात. आज अशाच एका व्यक्तीची कथा आपण जाणून घेणार आहोत.
धाराशिव जिल्ह्यातील जवळा निजाम येथील तौकीर मुल्ला यांनी एक वर्षापुर्वी शिफा इसी पोल्ट्री फार्म नावाने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यामध्ये त्यांनी पक्षांना ॲटोफीड सिस्टीम राबवण्यात आली आहे. एसी कूलिंग पॅड, अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या पोल्ट्री शेडमध्ये 17 हजार पक्ष्यांची देखभाल केली जाते.
advertisement
पावसाळा आणि Viral Infection, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी, महत्त्वाच्या टिप्स
केवळ 35 दिवस या पक्षांना सांभाळले जाते. तौकीर मुल्ला यांनी या पक्ष्यांच्या देखभालीसाठी दोन कामगार नियुक्त केले आहेत. ते कामगार या पक्षांची देखभाल करतात. 35 दिवसानंतर पक्षांची पूर्ण वाढ झाल्यानंतर या पक्ष्यांची विक्री केली जाते. तौकीर यांनी एका खाजगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यातून सदरील कंपनी त्यांना फीड, मेडिसिन आणि पक्षांची पिल्ले पोहोच करते.
तौकीर हे 35 दिवस पक्षांचा सांभाळ करतात आणि त्यानंतर कंपनी पक्ष्यांना घेऊन जाते. त्यातून एका बॅच पाठीमागे तौकीर यांना पाच ते सहा लाख रुपये शिल्लक राहतात. वर्षातून ते सात बॅच तयार करतात. यातून त्यांना वर्षाकाठी 35 लाख रुपयांची उलाढाल होत, असल्याचे ते म्हणाले. नोकरीच्या पाठीमागे लागणारी अनेक तरुण मंडळी नवीन व्यवसाय शोधत आहे. त्यांच्यासाठी तौकीर यांनी शोधलेला हा व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी आहे.