लग्नाचे कपडे घेण्याचा खर्च वाचेल, ठाण्यातील या दुकानात रेंटची सुविधा; सुंदर लेहंगा, शेरवानी, वन पीसही उपलब्ध
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
पूजन लॉकडाऊनपासून हा व्यवसाय करत आहे. त्याच्या या दुकानात तुम्हाला लग्न समारंभासाठी लागणाऱ्या नवरा नवरीच्या कपड्यांपासून ते पार्टीवेअर्स, ट्रॅडिशनल लेहेंगे, मॅटरनिटी गाऊन हे सगळे कपडे भाड्याने मिळतात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : अनेक जण लग्न समारंभ किंवा बर्थडे शूट साठी महागडे ड्रेस घेतल्यानंतर एकदाच घालून ते तसेच ठेवून देतात. इतके महागडे कपडे घेऊन सुद्धा त्यांचा परत वापर होत नाही. यावरच तोडगा म्हणून ठाण्यातील पूजन नावाच्या एका तरुणाने एक युक्ती गेली आहे. ठाण्यात त्याचे द रेंटल अटायर हे शॉप आहे.
पूजन लॉकडाऊनपासून हा व्यवसाय करत आहे. त्याच्या या दुकानात तुम्हाला लग्न समारंभासाठी लागणाऱ्या नवरा नवरीच्या कपड्यांपासून ते पार्टीवेअर्स, ट्रॅडिशनल लेहेंगे, मॅटरनिटी गाऊन हे सगळे कपडे भाड्याने मिळतात. यांची किंमत फक्त दीड हजार रुपयांपासून सुरू होते.
advertisement
हल्ली असणाऱ्या ट्रेंडनुसार अनेकांना त्यांच्या लग्नात महागडे कपडे घालण्याची हाऊस असते. मात्र, हे सगळे मॅरेज आऊटफीट 40 हजार, 50 हजार किमतीचे प्रचंड महाग असल्याने सगळ्यांनाच परवडणारे नसतात. अशा सगळ्यांसाठी हे ठिकाण एक सुवर्णसंधी आहे. इथे तुम्हाला महिलांचे कपडे रेंटने मिळतीलच.
पावसाळा आणि Viral Infection, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी, महत्त्वाच्या टिप्स
पण त्यासोबत पुरुषांना लग्नासाठी लागणाऱ्या सुंदर शेरवानी त्यासोबतच रिसेप्शनसाठी लागणारे ब्लेझरसुद्धा अगदी कमी किमतीत भाड्याने मिळतील. बॉलिवूडमध्ये लेहंग्याना विशेष पसंती आहे. तुम्हालाही बॉलीवूडमधील अभिनेत्रींप्रमाणे सुंदर लुक करायचा असेल तर नक्की या द रेंटल अटायर शॉपला तुम्ही भेट देऊ शकतात.
advertisement
मॅटरनिटी गाऊनमध्येही इथे खूप व्हरायटी उपलब्ध आहेत. अगदी सिम्पल गाऊनपासून ते बटरफ्लाय गाऊन पर्यंत इथे तुम्हाला हवे ते आउटफिट मिळतील. या सगळ्यांमध्ये तुम्हाला हवी असणारी स्टाईल, कलरसुद्धा उपलब्ध आहे. 'लॉकडाऊनमध्येच मी असा व्यवसाय करायचा हा विचार केला. अनेक जण महागडे कपडे घेतात. पण नंतर त्यांचा काही उपयोग होत नाही.
advertisement
त्यापेक्षा भाड्याने कपडे घेऊन एक दिवसासाठी ते घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पैसे वाचतात आणि त्यासोबत हौस, मौजसुध्दा करता येते,' असे द रेंटल अटायर याचे दुकानदार पूजन यांनी सांगितले.
advertisement
कुठे आहे हे शॉप -
द रेंटल अटायर हे दुकान ठाणे वेस्टमध्ये नौपाडा येथे आहे. त्यांनी आता नव्यानेच फोटो स्टुडिओ सुद्धा सुरू केलेला आहे. यामध्ये तुम्ही जाऊन सुंदर कपडे घालून सुंदर बॅकग्राऊंड मध्ये फोटोशूटही करू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 13, 2024 5:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
लग्नाचे कपडे घेण्याचा खर्च वाचेल, ठाण्यातील या दुकानात रेंटची सुविधा; सुंदर लेहंगा, शेरवानी, वन पीसही उपलब्ध