त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, धुळ्यातील या निकालानंतर डॉ शोभा बच्छाव यांच्याकडून फेर मतमोजणीचा अर्ज आला आहे. त्यामुळे इथला निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा 60.61 टक्के मतदान झालं होतं. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असलं तरी सध्याचं चित्र काहीसं वेगळं होतं. सध्या कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन शेतकरी वर्गाची केंद्र सरकारवर नाराजी दिसून आली. मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता. तसंच धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटचाऱ्या, कालव्यांचे प्रश्न कायम होता. त्यामुळे, मतदारराजा कोणाचं पारडं जड करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच ता निकाल समोर आला आहे.
advertisement
2019 सुभाष भामरेंचा विजय-
2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत धुळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. 2019 मध्ये काँग्रेसनं उमेदवार बदलत कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. पण भामरेंच्या विरोधात त्यांना विजय मिळवता आला नव्हता. 2019 मध्ये सुभाष भामरेंनी कुणाल रोहिदास पाटील यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता.