Dindori Loksabha Result 2024 : दिंडोरी लोकसभेचा निकाल समोर! भारती पवारांचं कमळ फुललं की भगरेंची तुतारी वाजली?

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे हे 1 लाख 12 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

डॉ. भारती पवार आणि भास्कर भगरे
डॉ. भारती पवार आणि भास्कर भगरे
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील डॉ. भारती पवार यांचं कमळ फुलणार की महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांची तुतारी वाजणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून दावे- प्रतिदावे सुरू झाले होते. दरम्यान, यावेळी विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार हे आता समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे हे 1 लाख 12 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सलग तीन वेळा भाजपच्या ताब्यात होता. भाजपने विद्यमान खासदार भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली. भारती पवार या केंद्रात मंत्री आहेत. मात्र, भगरे हेदेखील काँटे की टक्कर देताना दिसले. अखेर भगरे यांनी मोठ्या मताधिक्याने येथे विजय मिळवला.
advertisement
निफाडमध्ये शरद पवार यांची सभा घेऊन महाविकास आघाडीने अगोदरच मुसंडी मारली होती. त्यात कांद्या निर्यातबंदीसह केंद्र शासनाच्या शेती विरोधी धोरणाची धग शेतकऱ्यांच्या मनात कायम राहीली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात इथे चुरशीची स्पर्धा झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर भगरे यांना तिकीट दिलं. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्काही वाढला आहे. याचा फायदा भगरे यांना झाला असल्याचंही आता समोर येत आहे.
advertisement
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. सहापैकी 4 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. एका जागेवर भाजपचा तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dindori Loksabha Result 2024 : दिंडोरी लोकसभेचा निकाल समोर! भारती पवारांचं कमळ फुललं की भगरेंची तुतारी वाजली?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement