देशभरात गेल्या 29 जुलैलाच नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला होता. या सणानिमित्त शिरपूर तालुक्यात सर्पमित्र म्हणून परिचित असलेला राज याने नागपंचमीच्या निमित्ताने चक्क नागासमोर केक ठेवून त्याचा वाढदिवस साजरा केला. इतकच नाही तर नागाच्या वाढदिवसाचा केक कापून त्याला केक भरवतानाचा रिल तयार करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल देखील केला होता.
advertisement
नागाच्या वाढदिवसाच्या हा व्हायरल रील समोर आल्यानंतर बोराडी प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने राज वाघ याला ताब्यात घेतले. बोराडे गावातील एका घरातून काही दिवसांपूर्वी राज यांनी नागाला पकडत त्याचा रेस्क्यू केलं होतं. मात्र त्याला वन अधिवासात सोडण्याऐवजी राज याने त्याचा वाढदिवस साजरा करत त्याला केक भरवतानाचे रील तयार केले.
या घटनेची माहिती बोराडी प्रादेशिक वनविभागाच्या पथकाला मिळताच वनविभागाने सर्पमित्र राज वाघ विरोधात कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.
नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रिल्सस्टारला अटक
बारामतीत सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे.
खरं तर गेल्या 25 जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून भरधाव वेगाने नेत होता. यामुळे फुटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत होता. अशाप्रकारे तो फुटपाथवर जीवघेणी स्टंट करून नागरीकांचा जीव धोक्यात घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या युवकाचा शोध सूरू केला होता.
यावेळी या व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने (एम.एच 42 बी.पी. 0090) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. तसेच संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली.त्यानंतर वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली होती.