धुळ्यातील शिंदखेडा नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्याचे पणन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांना जोरदार धक्का बसला आहे. शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कलावती माळी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या रजनी वानखडे यांचा पराभव झाला आहे. शिंदखेडा हा मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यातली पहिली बिनविरोध दोंडाईचा नगरपालिका निवडून देणाऱ्या मंत्री जयकुमार रावलांना धक्का बसला आहे.
advertisement
पालकमंत्र्यांना धक्का दिल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालासोबत नोटा सुद्धा उधळल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सर्वत्र व्हायरल झाला आहे.
