TRENDING:

सुप्रीम कोर्टात हजर व्हा नाहीतर 6,00,00,000 कोटी द्या! एका कॉलमुळे नाशिकच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त

Last Updated:

नाशिकमध्ये सुप्रीम कोर्टाच्या नावाने सायबर ठगांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून ६ कोटी व ७२ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलीस तपास सुरू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजकाल कधी कुठे काय होईल आणि तुमचं नाव कुठे कशात जोडलं जाईल याचा नेम नाही. त्यामुळे आपली वस्तू सांभाळून ठेवणं आणि कुठेही आपलं नाव नंबर, डॉक्युमेंट सादर करताना काळजी घ्यायला हवी. नाशिकमध्ये एका व्यक्तीसोबत भयंकर प्रकार घडला. सुप्रीम कोर्टात हजर व्हावं लागेल नाहीतर 6 कोटी रुपये दंड भरावा लागेल. ज्या वयात माणसाला शांत आणि सुरक्षित जीवन जगायचे असते, त्याच वयात त्यांना धमकावण्यात आले. एका प्रकरणाने तर साऱ्या शहराला हादरवून सोडले—एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ कोटी रुपयांना लुटण्यात आले! तर दुसऱ्या एका प्रकरणात ७२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
News18
News18
advertisement

विशेष म्हणजे, या दोन्ही घटनांमध्ये फसवणूक करणाऱ्यांनी चक्क सुप्रीम कोर्टाच्या नावे आणि ऑनलाईन हजर होण्याची भीती दाखवली. घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी आपले आयुष्यभर साठलेली जमापुंजी आरटीजीएसच्या माध्यमातून या ठगांच्या हवाली केले. सायबर गुन्हेगार आता लोकांना फसवण्यासाठी 'डिजिटल अरेस्ट' नावाचा एक नवा आणि धोकादायक मार्ग वापरत आहेत. नाशिकमध्ये अशाच प्रकारे दोन मोठ्या फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये ज्येष्ठांना भीती दाखवून मोठा गंडा घालण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ कोटी रुपये तर दुसऱ्याला ७२ लाख रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे नाशिक हादरले.

advertisement

सुप्रीम कोर्टाच्या नावाने फसवणूक

विशेषतः, या दोन्ही प्रकरणात फसवणूक करणाऱ्या टोळीने नागरिकांना भीती घालण्यासाठी एक धक्कादायक मार्ग वापरला. त्यांनी नागरिकांना धमकावले की, तुम्हाला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाईन हजर केले जात आहे. आर्थिक गैरव्यवहार किंवा अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे खोटे कारण देऊन डिजिटल अरेस्ट ची भीती दाखवली गेली. या प्रचंड भीतीमुळे घाबरलेल्या नागरिकांना सायबर ठगांनी आरटीजीएसच्या माध्यमातून मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

advertisement

6 कोटींची फसवणूक: अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी

नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी व्हिडीओ कॉल केला. कॉलवर त्यांना सांगण्यात आले की, "तुमच्या सिमकार्डमधून अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात हजर केले जाईल." या धमकीमुळे तो ज्येष्ठ नागरिक खूप घाबरला. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत सायबर ठगांनी त्याला त्वरित ६ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे, एका क्षणात त्या नागरिकाला ६ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला.

advertisement

सीबीआय अटक करेल अशी धमकी

दुसऱ्या एका प्रकरणात, अनिल लालसरे नावाच्या ज्येष्ठ नागरिकालाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले. ठगांनी त्यांना फोन करून सांगितले की, "तुमच्या आधारकार्डवर क्रेडिट कार्ड जारी झाले असून, त्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाला आहे." जर त्यांनी त्वरित ७२ लाख रुपयांचा दंड भरला नाही, तर सीबीआयचे पथक त्यांना अटक करून थेट दिल्लीला घेऊन जाईल, अशी दमबाजी करण्यात आली. या धमक्यांना घाबरून अनिल लालसरे यांनी त्वरित ७२ लाख रुपये आरटीजीएस केले.

advertisement

सायबर पोलिसांकडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळी फराळातून दिला रोजगार, 10 दिवसांत 60 लाखांची उलाढाल, ज्योती यांची यशोगाथा
सर्व पहा

'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या दोन्ही मोठ्या फसवणूक प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या हाय-प्रोफाइल फसवणुकीचा तपास करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारे येणाऱ्या कोणत्याही धमक्यांना किंवा कॉलला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुप्रीम कोर्टात हजर व्हा नाहीतर 6,00,00,000 कोटी द्या! एका कॉलमुळे नाशिकच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल