TRENDING:

शाळेतील बेंचवर बसण्याचा वाद चौकात, दोन गटात तुफान हाणामारी; पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवला जमाव

Last Updated:

शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनिल साबळे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौक ते भोकरदन रोडवरील मक्का मस्जिद परिसरात सोमवारी दुपारी किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली. शाळेतील बेंचवर बसण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला आणि अखेर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून, दोन्ही पक्षांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींनंतर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर दुपारी संबंधित विद्यार्थ्यांचे नातेवाईक मक्का मस्जिद परिसरात आमनेसामने आले. वाद वाढताच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यात तीन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

advertisement

नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

सध्या दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आठ-आठ जणांविरुद्ध मारहाण, धमकी आदी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेनंतर सिल्लोड शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळी फराळातून दिला रोजगार, 10 दिवसांत 60 लाखांची उलाढाल, ज्योती यांची यशोगाथा
सर्व पहा

शहरातील गुन्हेगारीत वाढ होत आहे, त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न देखील या घटनेमुळे अधोरेखित झाला आहे. अनेक वेळा शाळा कॉलेज परिसरात वैयक्तिक आणि किरकोळ कारणातून अनेक मुलांच्या हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. बाल गुन्हेगारी वाढली असल्यामुळे या अल्पवयीन मुलांचे शाळा, कॉलेज आणि खाजगी क्लासेसमध्ये समुपदेशन होणं गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शाळेतील बेंचवर बसण्याचा वाद चौकात, दोन गटात तुफान हाणामारी; पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवला जमाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल