पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात फटाके मुक्त दिवाळी साजरा केली जाते. गावातील लहान चिमुकले किल्ले बनवून, विविध प्रकारचे खेळ खेळत दिवाळी साजरा करतात. गेल्या 11 वर्षापासून या गावात दिवाळी हा सण फटाके मुक्त सण साजरा केला जातो. चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने शेतात जाऊन कुत्रा मरण पावला होता. तेव्हा चिंचणी गावातील गावकऱ्यांनी एक बैठक घेतली व गावात इथून पुढे दिवाळी असो किंवा कोणताही सण असो कोणत्याही प्रकारचे फटाके फोडायचं नाही.
advertisement
तेव्हापासून आजपर्यंत गावात फटाके फोडले जात नाही. फटाक्यामुळे पाळीव प्राणी तसेच पशुपक्ष्यना त्रास होतो. याची जाणीव चिंचणी येथील ग्रामस्थांना झाली त्यामुळे पशुपक्ष्यांना होणारा त्रास थांबवण्यासाठी गावात फटाके फोडले जात नाही. म्हणून चिंचणी गावामध्ये प्रवेश केला असता पक्षांचा किलबिलाट कानी ऐकायला येतो. गावात पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावकऱ्यांनी चिंच, पेरू, आंबा, सीताफळ, चिक्कू यांची हजारो झाडे गावात लावलेले आहे. चिंचणी गावाने उचललेला पाऊल संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श निर्माण करणार आहे.