या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. 8 ते 9 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने अशाप्रकारे गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा पती हा राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे. पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता.
advertisement
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेहाची पोस्टमॉर्टेमसाठी पाठवणी करण्यात आली आहे कुटुंबीयांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड व इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. वरळी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
