मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ही घटना घडली. डॉ.संजय ढवळे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचं नाव आहे. ढवळे हे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉक्टर संजय ढवळे यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर ढवळे हे भूल तज्ञ म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णालयात कार्यरत होते. ढवळे यांनी भूल देण्याच्या औषधाचे इंजेक्शन त्यांनी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. डॉ. ढवळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संजय ढवळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेली नाही. ही घटना कौटुंबिक कारणामुळे घडली की व्यावसायिक दबावामुळे, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी चर्चा होत आहे. या प्रकरणात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
