आता या शपथविधी सोहळ्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्याबाबत आपल्याला काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत बैठक घेतली, याबद्दलही आपल्याला काहीच माहीत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं. पवारांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर देखील भाष्य करताना म्हणाले, मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होती. अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. येत्या १२ तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असं मोठं वक्तव्य देखील शरद पवारांनी केलं आहे. या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याला थेट ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र विलीनीकरणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठे नेते उत्सुक नाहीयेत. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सुनेत्रा पवारांच्या हाती उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं दिल्याचा आता चर्चा सुरू झाली आहे.
