मुंबईकरांनो! ॲाफिसला जाण्याआधी ही बातमी वाचा! कारण इथं मार्ग आहे बंद
अलीकडेच, दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) वन आणि वन्यजीव विभागात फॉरेस्ट गार्डच्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती 12वी उत्तीर्ण असलेल्या, निसर्ग आणि जंगलांच्या संरक्षणाच्या कामात आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवार DSSSB च्या अधिकृत वेबसाइट https://dsssb.delhi.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत, कारण शेवटची तारीख जवळ आली आहे.
advertisement
पाली भाषेला स्वतंत्र विभाग द्यावा ; मुंबई विद्यापीठात पाली भाषेसाठी 23 दिवसांपासून सुरू आंदोलन
ज्या इच्छुक उमेदवारांनी अजूनही अर्ज केलेला नाही, अशांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीमध्ये एकूण 52 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यापैकी 19 पदे खुल्या प्रवर्गासाठी, 18 पदे इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहेत. अनुसूचित जाती (SC) साठी 6 पदे, अनुसूचित जमाती (ST) साठी 5 पदे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) साठी 4 पदे देण्यात येणार आहेत. म्हणजेच ही भरती सर्व वर्गातील तरुणांसाठी संधी घेऊन आली आहे.
फॉरेस्ट गार्डच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराची किमान वय 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असावे. नमूद केलेल्या वयाची गणना 16 सप्टेंबर 2025 या तारखे प्रमाणे केली जाणार आहे. तर, आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वय मर्यादेत सवलत दिली जाईल.
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत, केली महत्वाची मागणी
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. तर SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. अर्ज शुल्काचा भरणा केवळ ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे करता येईल.
फॉरेस्ट गार्डच्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-3, ग्रुप-सी अंतर्गत वेतन दिले जाईल. सुरुवातीचा पगार 21,700 रुपये असेल, जो कालांतराने वाढून कमाल 69,100 रुपयेपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय उमेदवारांना इतर सरकारी भत्ते आणि सुविधाही मिळतील.