Mumbai Traffic Update : मुंबईकरांनो! ॲाफिसला जाण्याआधी ही बातमी वाचा! कारण इथं मार्ग आहे बंद
- Published by:Tanvi
Last Updated:
Mumbai Route : मुंबईकरांनो, लक्ष द्या. एलफिन्स्टन ब्रिज तात्पुरते बंद असल्यामुळे कामाला जाण्याआधी तुमच्या मार्गाची योजना करून घ्या.
मुंबई : मुंबईकरांनो कामाला निघण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. अन्यथा एलफिन्स्टन ब्रिजच्या कामामुळे वाहतुकोंडीचा सामना करावा लागू शकतो. परेल आणि प्रभादेवी परिसरास पुर्व-पश्चिमेकडे जोडणारा एलफिन्स्टन ब्रिज तात्पुरते बंद केला जाणार आहे. हा ब्रिज रात्री 11:59 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद राहणार असून, त्याठिकाणी नवीन एलफिन्स्टन उड्डाणपुल तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) ने या कामांसाठी मार्गदर्शन जारी केले आहे. पूर्वी ही अधिसूचना 25 एप्रिल 2025 रोजी लागू होण्याची अपेक्षा होती.मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. आता, 12 सप्टेंबर 2025 पासून रात्री 11:59 वाजल्यापासून नवीन वाहतूक व्यवस्थापन लागू होणार आहे.
बदलेले वाहतूक मार्ग जाणून घ्या
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दादर पूर्वेकडून दादर पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणारे वाहन चालक टिळक ब्रिजचा वापर करतील. पटेलपूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परेलकडे जाणारे वाहन 7.00 ते 15:00 वाजेपर्यंत करी रोड ब्रिज वापरतील. तसेच परेल आणि भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड आणि शिवडी-लिंककडे जाणारे वाहन चालक चिंचपोकळी ब्रिज वापरतील.
advertisement
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहन टिळक ब्रिज वापरतील. प्रभादेवी आणि लोअर परेल पश्चिमेकडून परेल, टाटा रूग्णालय आणि के.ई.एम. रुग्णालयकडे जाणारे वाहन 15:00 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत करी रोड ब्रिज वापरतील. कोस्टल रोड आणि सि-लिंक मार्गे प्रभादेवी आणि वरळीकडून परेल तसेच भायखळा पूर्वकडे जाणाऱ्या वाहनांना चिंचपोकळी ब्रिजचा वापर करावा लागेल.
advertisement
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज)वर सकाळी 7:00 ते 15:00 वाजेपर्यंत वाहतूक भारत माता जंक्शनकडून शिंगटे मास्तर चौककडे एकदिशात्मक राहील, तर 15:00 ते 23:00 वाजेपर्यंत परतीच्या दिशेने एकदिशात्मक होईल. रात्री 11:00 ते सकाळी 7:00 वाजेपर्यंत दोन्ही दिशांमध्ये वाहतूक सुरू राहील.
नो पार्किंग मार्गांमध्ये मा.म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरूजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावबहाद्दूर एस.के. बोले मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग यांचा समावेश आहे. सेनापती बापट मार्गावर दुहेरी वाहतूक चालू राहील.
advertisement
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी MMRDA ने प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिम पादचारी पूल आणि परेल रेल्वे स्थानक पूर्वेकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या सोबत व्हीलचेअरचीही व्यवस्था केली गेली आहे. या नियोजनामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक मिळेल तसेच अपघाताचा धोका कमी होईल आणि ब्रिजवरील कामामुळे निर्माण होणारी असुविधा कमी होईल. मुंबईकरांनी या मार्गदर्शनानुसार वाहतूक करणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रवास सुरक्षित आणि नियोजित होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic Update : मुंबईकरांनो! ॲाफिसला जाण्याआधी ही बातमी वाचा! कारण इथं मार्ग आहे बंद