पक्षप्रवेश सोहळ्यावरून महायुती सरकारमध्ये खडाखडी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्ली गाठली. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तक्रार केल्याची माहिती समोर आली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
'एकनाथ शिंदे रडणार नाही, लढणारा नेता'
बिहारमध्ये एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी इथं आलो होतो. तक्रारीचा पाढा वाचणारा आणि रडणारा एकनाथ शिंदे नाही, एकनाथ शिंदे लढणारा नेता आहे. छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही इथं आणत नसतो. एनडीएमध्ये पाच पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीमुळे बिहारमध्ये मोठं यश मिळालं. त्यांना जंगलराज नको होतं, विकासाचं राज्य होतं, त्यामुळे एकत्र आलो म्हणून यश आलं आहे. महाराष्ट्रातही एकीचं बळ आणि एकजुटीची ताकद काय असते त्यामुळे विजय मिळाला' अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.
advertisement
मंत्र्यांनी का बहिष्कार टाकला?
'कॅबिनेट बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला ही प्रसारमाध्यमांची पतंगबाजी आहे. मीडियातच बातम्या सुरू आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्तरावर अडचणी असतात त्या इथं आणत नाही. काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा झाली. महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. तो विषय संपला आहे, तो काही दिल्लीचा विषय नाही, असं शिंदे म्हणाले.
नाराजी दूर झाली का?
'नाराजीचा विषय हा नव्हता. तो स्थानिक पातळीवर होता. तो इथला विषय नव्हता, असंही शिंदे म्हणाले. "रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांनी आव्हान देत आहे, नेत्यांची नाव घेत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता", शिंदे म्हणाले की, 'या बाबतीत त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहे ते निर्णय घेतील. जो काही पक्षप्रवेशावरून वाद झाला. तो विषय आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. शिवसेना आणि भाजपमध्ये वाद नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नाही. महायुती मजबुतीने समोर जात आहे. जसं विधानसभेत यश मिळालं. तसं स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.
