TRENDING:

निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, काय सुरु आहे राज्याच्या राजकारणात? चर्चांना उधाण

Last Updated:

महायुतीतल्या धुसफुशीवर विरोधकांचा रोख असला तरी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वातावरण तापयला लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सदिच्छा भेट की जागावाटपाच्या तिढ्यावर तोडग्यासाठी शिंदेंनी हा दिल्ली दौरा केला याची चर्चा सुरू झालीय. शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे
News18
News18
advertisement

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. प्रत्येक पक्षाकडून आपापल्या ताकदीची चाचपणी केली जात आहे.अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मध्यरात्री तातडीनं दिल्ली गाठली. दिल्ली दौऱ्यात असलेल्या एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील भेट सदिच्छा भेट असल्याचा तसेच विकासकामांसंदर्भात भेट असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तर शिंदेंच्या या अचानक दिल्ली वारीवर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

advertisement

निधी वाटपावरून महायुतीत नाराजी

महायुतीतल्या धुसफुशीवर राऊतांचा रोख असला तरी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. निधी वाटपावरून महायुतीत नाराजीची चर्चा आहे.

पूरग्रस्त भागांची मोदींनी केली चौकशी

advertisement

विरोधकांनी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून निशाणा साधला असला तरी शिंदेंनी मात्र पंतप्रधान मोदींसोबत केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाबाबत मोदींनी चौकशी केल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

शिंदेंनी दिल्ली दौरा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ते महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.मात्र अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यापूर्वी शिंदेंनी दिल्ली दौरा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, काय सुरु आहे राज्याच्या राजकारणात? चर्चांना उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल