मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सोबत बसले होते. एकनाथ शिंदे माझ्या रिक्षात बसले, हे मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत आहे, मी आज खूर आनंदी आहे, असे रंजना सपकाळे म्हणाल्या.
मी त्यांना बिग ब्रदर म्हणते. त्यामुळे माझ्या रिक्षात मी त्यांचं बिग ब्रदर म्हणून पोस्टर लावणार आहे, असेही रंजना सपकाळे यांनी आवर्जून सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यासारखा भाऊ आपल्याला कधीच भेटणार नाही की जो आपल्याला प्रत्येक महिन्यात दिवाळी देतो, अशा शब्दात रंजना सपकाळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे सुद्धा माझ्या रिक्षात बसले, त्याचा मला खूप आनंद आहे. मला एवढा आनंद झाला आहे की मला बोलता सुद्धा येत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खूप चांगले काम केले. त्यांच्या रुपात खूप चांगले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, असे रंजना सपकाळे म्हणाल्या. एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी लोकांच्या मनात त्यांचे पद हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नाही, असेही त्या म्हणाल्या.
