TRENDING:

उमेदवारांच्या प्रतिनिधींनो इकडे लक्ष द्या.. निवडणूक आयोगाची विशेष सूचना, टपाली मतपत्रिकांच्या पेट्यासंदर्भात अपडेट

Last Updated:

Election Commission Mahapalika Election: टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ -२६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी- २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून (स्टाँग रुम) बाहेर काढण्यात येणार नाहीत.
निवडणूक आयोग
निवडणूक आयोग
advertisement

राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांच्‍या आदेशानुसार, टपाली मतपत्रिकेच्‍या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएम) मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्‍यात येतील.

त्या अनुषंगाने, उमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरीत्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) देखील त्याचवेळेला करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

advertisement

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

advertisement

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उमेदवारांच्या प्रतिनिधींनो इकडे लक्ष द्या.. निवडणूक आयोगाची विशेष सूचना, टपाली मतपत्रिकांच्या पेट्यासंदर्भात अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल