TRENDING:

पत्नीसोबत फिरायला गेलेला गडचिरोलीतील तरुण; लग्नानंतर 4 दिवसातच नवरीच्या डोळ्यादेखत धक्कादायक शेवट

Last Updated:

लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गडचिरोली (महेश तिवारी, प्रतिनिधी) : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. असं म्हणतात, की या दिवसापासून आपण एका नव्या आयुष्यात प्रवेश करतो. या दिवसानंतर आपल्या प्रत्येक सुख-दुःखात एक जोडीदार आपल्यासोबत नेहमी उभा असतो. मात्र, गडचिरोलीतील एका नवरदेवासोबत भयंकर घडलं. लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाला.
बुडून दोघांचा मृत्यू
बुडून दोघांचा मृत्यू
advertisement

लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27) रा. चंद्रपूर असं नवरदेवाचं नाव आहे. यात घटनेत नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृतकाचं नाव आहे.

छ. संभाजीनगरात 'गब्बर'ची एन्ट्री; 'भ्रष्टाचारी अधिकऱ्यांना सोडणार नाही', 100 जणांच्या गँगचा व्हायरल पत्रात दावा

advertisement

नवनीत हा लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत फिरायला गेला होता. तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला. तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले. यावेळी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके आणि धात्रक यांचं कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेलं होतं. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

advertisement

किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोर खून

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रात्री १० वाजेच्या सुमारास टपरी चालकाचा किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोरच चाकूने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली. रस्त्यावरील हा प्रकार पाहून नागरिकही भयभीत झाले. या घटनेत सुनील राठोड यांचा मृत्यू झाला आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पत्नीसोबत फिरायला गेलेला गडचिरोलीतील तरुण; लग्नानंतर 4 दिवसातच नवरीच्या डोळ्यादेखत धक्कादायक शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल