काही दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार जिल्ह्यातून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवू दसरू कुमोटी वय साठ वर्ष, बिच्चे देवू कुमोटी वय 55 वर्ष दोघे राहणार गुंडापुरी ता. भामरागड आणि अर्चना रमेश तलांडे वय दहा वर्ष राहणार येरकल तालुका एटपल्ली अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत.
advertisement
देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी एटापल्ली तालुक्यात राहाते, त्यांची मुलगी अर्चना ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. या घटनेत तिचाही मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. तिघांचे गळा चिरलेल्या अवस्थेमधील मृतदेह घरात आढळून आल्यानं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
