या स्फोटात सहा जवान गंभीर जखमी झाले होते, त्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार जवान गंभीर जखमी असून त्यांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी ठार झाले होते सुमारे सहा तास ही चकमक सुरू होती, त्यानंतर आता नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.
advertisement
बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली 7 सी 60 पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या कारवाईदरम्यान सुमारे 6 तासांहून अधिक काळ गोळीबार सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 12 माओवादी ठार झाले आहेत. यावेळी तीन एके ४७, २ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
