TRENDING:

Big Breaking : कोणत्याही सामुदायिक अन्नदानापूर्वी घ्यावी लागणार परवानगी; आत्राम यांची मोठी घोषणा

Last Updated:

राज्यात आता लग्न व इतर कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी अन्नदानापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत मंत्री आत्राम यांनी घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गडचिरोली, 10 डिसेंबर, महेश तिवारी : मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात आता यापुढे लग्न, वाढदिवस या कार्यक्रमांसह प्रसाद वाटप आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात यापुढे परवानगीशिवाय कुठलाही अशा स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ते गडचिरोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
News18
News18
advertisement

नेमकं काय म्हणाले आत्राम? 

आनंदाच्या अथवा दु:खाच्या कोणत्याही प्रसंगी भोजनदान करण्यापूर्वी, प्रसाद वाटप आणि कोणत्याही उत्सवात सामुदायिक स्वरुपात जर भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर परवानगी घ्यावी लागेल. परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करात येणार नाही. भोजनादरम्यान अन्नाची गुणवत्ता राखील जावी, आणि विषबाधेसारखे प्रकारे टाळले जावेत यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचं मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

त्यामुळे आता कोणत्याही सामुदायिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे अन्नातून विषबाधेसारखे प्रकार टळण्यासोबतच अन्नाची गुणवत्ता राखण्यात मदत होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Big Breaking : कोणत्याही सामुदायिक अन्नदानापूर्वी घ्यावी लागणार परवानगी; आत्राम यांची मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल