Ganesh Naik on Eknath Shinde Palghar : राहुल पाटील, पालघर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही,अशा शब्दात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. विशेष म्हणजे ज्यावेळेस गणेश नाईक यांनी हे मोठं विधान केलं त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि बोईसरचे आमदार विलास व्यासपीठावर उपस्थित होते.
advertisement
पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, पण एकनाथ शिंदे यांना लागली, मात्र लागल्यानंतर ती योग्य टिकवता आलं पाहिजे, असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे महत्वाचं आहे, असे गणेश नाईक म्हणाले. विशेष म्हणजे गणेश नाईक बोलत असताना व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांचे पालघर चे आमदार राजेंद्र गावित आणि बोईसर चे आमदार विलास तरे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
गणेश नाईक पुढे म्हणाले, 50 कोटी झाडे लावण्याच ठरवलं आहे. यावर्षी टार्गेट आहे 10 कोटी. गडचिरोलीला एक कोटी एक्स्ट्रा आहे आणि पालघरला 1 कोटी एक्स्ट्रा आहे. आता एवढी रोप आणणार कुठून.आता, 250 कोटी कुठून आणणार. त्याकरता टीश्यू कल्चरच्या पाच लॅब एक कोकणामध्ये पण एरीया आम्ही ठरवला नाही. कदाचित पालघर जिल्ह्याला ही संधी देऊन टाकून असे गणेश नाईक म्हणाले आहेत.
