TRENDING:

Pune Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद

Last Updated:

अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
गणपती विसर्जनामुळे पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठे बदल
गणपती विसर्जनामुळे पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठे बदल
advertisement

पुणे, 26 सप्टेंबर : अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विसर्जनावेळी पुण्यातले वाहतूक बदल आणि पोलीस बंदोबस्त याबद्दल माहिती दिली आहे. पुण्यात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसंच 3,865 गणेश मंडळांचं विसर्जनाचं नियोजन असणार आहे, यासाठी मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचं रितेश कुमार यांनी सांगितलं आहे. नागरिकांच्या वाहतूक मार्गदर्शनासाठी ' सारथी गणेशोत्सव गाईड 2023' सुरू केलं आहे. गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे, असंही पुण्याचे पोलीस कमिशनर म्हणाले.

advertisement

विसर्जनाच्या दिवशी पुण्यातले हे रस्ते असणार बंद

शिवाजी रोड

लक्ष्मी रोड

बाजीराव रोड

कुमठेकर रोड

गणेश रोड

केळकर रोड

टिळक रोड

शास्त्री रोड

जंगली महाराज रोड

कर्वे रस्ता

फर्ग्युसन रोड

भांडारकर रस्ता

पुणे सातारा रोड ( व्होल्गा चौक ते जेधे चौक)

सोलापूर रोड

प्रभात रोड

बगाडे रोड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

गुरुनानक रोड

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल