बीड जिल्हा कारागृह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड गँग कारागृहात आल्यापासून काही ना काही घटना समोर येत आहेत. अगोदर VIP ट्रीटमेंट, त्यानंतर दोन गटात मारण्याची घटना. यामुळे वादग्रस्त ठरले होते. यातच कारागृह महासंचालक कार्यालयाच्या पथकाने अचानक तपासणी केली असता, रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त इतर लोकांना आरोपीला भेटू दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी या दोघांवर कारवाई केली. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकाच कारागृहात असलेल्या आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
advertisement
इतर लोकांशी होणाऱ्या भेटीमुळे कारागृह प्रशासन अडचणीत
याआधीही वाल्मीक कराडला कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप भाजप आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांनी वारंवार केले होते. त्यातच आता इतर लोकांशी होणाऱ्या भेटीमुळे कारागृह प्रशासन अडचणीत आले आहे.
रात्री शुगर झाली कमी
दरम्यान, काल रात्री उशिरा वाल्मीक कराडची तब्येत बिघडल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅनसाठी नेण्यात आलं. तपासणीत सिटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला आहे. वाल्मीक कराडची प्रकृती सुधारत आहेत. काल शुगर कमी झाल्याने बोलताना अडखळत बोलणे येत होते. आज यात सुधारणा होत आहे, त्यामुळे जिल्हा कारागृहातच उपचार दिले जात आहेत.