मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शिलापूर येथील काही तरूण भावीक दुचाकीवरून छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील बमलेश्वरी मातेच्या दर्शनाला निघाले होते. या दरम्यान त्यांच्या दुचाकीने ट्रकला मागून दिलेल्या धडकेत दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. संजय मानकर,आशिष फुने अशी या मृतांची नावे आहेत. त्याचसोबत या अपघातात एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. श्यामकुमार भोयर असे या जखमीचे नाव आहे. या जखमी व्यक्तीला छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
खरं तर छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील बमलेश्वरी मातेच्या दर्शनाला तीन तरूण एकाच दुचाकीवर निघाले होते. या दरम्यान राजनांदगाव जिल्ह्यातील छूरीया गावाजवळ या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेने शिलापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.