सुमेध रामटेके हा त्याच्या मोटारसायकलने अर्जुनी मोरगाव येथे गेला होता. तो गावाला परत येत असताना बोंडगावदेवी जवळ मिनी ट्रकने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सुमेध गंभीर जखमी झाला.
सुमेध जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडून होता. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच 108 क्रमांकावरून रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर जखमी सुमेधवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोंदिया येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पण गोंदियाला आणत असतानाच सुमेधचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असुन मिनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
July 26, 2025 5:43 PM IST