TRENDING:

'सर, मेरी मम्मी के बारे में नही बोलना था', MBBS विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; घटनास्थळी सापडले पत्र

Last Updated:

प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालय येथील एका एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आवेश कुमार असं मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

advertisement

मूळचा राजस्थानचा असणारा आवेश कुमार हा गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्यातृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून त्याने टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने सुसाईड नोट देखील लिहिली आहे. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू. आहे. पोलिसांना घटनास्थळी पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासन देखील या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे कारण काळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

advertisement

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहलंय?

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रशांत बागडे यांनी विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचे विद्यार्थ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे आहे. विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षका कक्षात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार सुरू आहे.

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात एकाची आत्महत्या

नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. एम्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या पाचव्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या संकेतने बाथरूमच्या दरवाजाला शॉल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे आता पुन्हा एक शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली असून अनेक प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केले जात आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सर, मेरी मम्मी के बारे में नही बोलना था', MBBS विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; घटनास्थळी सापडले पत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल