Gondia News : रवी सपाटे, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जलजीरा खाल्याने सात शाळकरी मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहित शाळेतील बाईंना कळताच त्यांनी सर्व मुलींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सध्या या मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जलजीरा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर पाचव्या वर्गाच्या मुलींनी शाळेलगत असलेल्या दुकानातून जलजीरा घेतला व तो पिण्याच्या पाण्यात टाकून प्यायल्यानंतर काही वेळानी त्यांना मळमळ, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सूरू झाला होता.
दरम्यान एकाच वर्गातील 7 विद्यार्थिनींना एका सोबत पोटात दुखू लागल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनींना विचारणा केली असता जलजीरा खाल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्या जलजीराचे पॅकेट तपासले असता 2025 च्या जानेवारी महिन्यात त्याची मुदत संपल्याचे समोर आले. त्यानंतर लगेच शिक्षकांनी सातही मुलींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तर सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.