TRENDING:

Gondia News : गोंदियात शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टराचं धक्कादायक पाऊल, आरोग्य विभागात खळबळ

Last Updated:

Gondia News : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टरने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
शिकावू डॉक्टराचं धक्कादायक पाऊल
शिकावू डॉक्टराचं धक्कादायक पाऊल
advertisement

गोंदिया, 4 सप्टेंबर : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टरने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भूषण विशाल वाढोणकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नावे आहे. त्याने वैद्यकीय महाविद्यालयातील वस्तीगृहातच आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात वास्तव्याला होता. इमारत क्रमांक 7 मध्ये तिसऱ्या माळ्यावर डी 31 क्रमांकाच्या रूममध्ये राहत होता. सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूम वर आला. रूममध्ये रहाणारा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने आपल्या ड्युटीवर गेला. सकाळी 8 वाजेपर्यंत रुम सहकाऱ्याने त्याला कॉल केला. मात्र, कॉलचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी रूमच्या बाजूला असलेल्या रूममध्ये राहणाऱ्यांना कॉल केले. त्यांनी रूम मध्ये जाऊन बघितले असता. भूषण याने सीलिंग पंख्याला दोराने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ही घटना सकाळी 8.30 ला उघडकीस आली. याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनस्थळी जाऊन मृतदेह काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस याविषयी अधिक तपास करीत आहेत. तर भूषण यांनी कोणत्या कारणाने गळ भास घेतला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

advertisement

वाचा - ब्लॅक मेलींगला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, स्टेटसमुळे फुटली गुन्ह्याला वाचा

दोन दिवसांपूर्वीच तरुणाने केली होती आत्महत्या

गोंदिया रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या हॉटेल हार्मोनी या हॉटेलमध्ये गोंदिया शहरातील एका युवकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सकाळी जेव्हा हॉटेलच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आवाज दिला तर कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही. त्यामुळे डुप्लिकेट चावीने रूम उघडण्यात आली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

गोंदिया शहरातील माताटोली येथे राहणारा 20 वर्षीय क्रिश विजय मानापुरे हा तरुण काल (1 सप्टेंबर) दुपारी हॉटेल हार्मनी या ठिकाणी थांबण्यासाठी आला. आपलं आधार कार्ड वगैरे घेऊन त्याने 103 नंबरची रूम बुक केले. त्या रूममध्ये शिफ्ट झाला. त्यानंतर आज सकाळी जेव्हा हॉटेलच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आवाज दिला तर रुममधून कोणताही प्रतिसाद त्यांच्या कडून आला नाही. त्यामुळे डुप्लिकेट चावीने रूम उघडण्यात आली. तर क्रिश याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याविषयी गोंदिया शहर पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी क्रिशने आत्महत्या का केली? आणि गोंदिया इथला तरुण गोंदिया शहरातील हॉटेलमध्ये का राहायला गेला? या विषयी आता गोंदिया शहर पोलीस तपास करीत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : गोंदियात शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टराचं धक्कादायक पाऊल, आरोग्य विभागात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल