अजित पवार गटाचा सरकारला घरचा आहेर
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू देण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये किरणताई कांबळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथील करण्याची मागणी केली. ज्या मध्ये वयोमर्यादा वाढवावी, टॅक्स पावतीची अट रद्द करावी, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू स्थापन करावं, अशा विविध मागण्या केल्या आहेत.
advertisement
गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील महिलांना मदत करावी लागत आहे. तर विविध साहित्यासाठी पुरुषांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव येथे घडली. कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पत्नी अपघातात मरण पावला. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथील करावी आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू केंद्र उघडावे, घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्यांना घेऊन महिलांनी मुक मोर्चा काढला. अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले.
वाचा - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुन्हा गोत्यात? भाजप आमदाराने केली कारवाईची मागणी
या योजनेची मुदत वाढ करावी अशी मागणी या महिलेने केली आहे. कारण गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसामुळे रोवणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टची तारीख आणखी वाढवावी अशी मागणी महिलांद्वारे करण्यात आली आहे. याकरिता चक्क अजित पार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवेदन दिले. आता शासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
