काय आहे घटना?
ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात भात पिकाचे निंदण करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार लोक शेतात जात होते. याचवेळी शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी तुळशीदास रेवाराम लंजे (वय 45 वर्षे), त्यांची पत्नी मायाबाई तुळशीदास लंजे (वय वर्ष 42 वर्षे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इंदुबाई हिरालाल लंजे (वय 43 वर्षे) या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती सुधा घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या लक्ष्यात आले की इथे विद्युत पुरवठा चालू आहे. त्यामुळे त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले. त्यामुळे इंदुबाई हिरालाल लंजे यांचे प्राण वाचवले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे 33 एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईनची तार मागील 5 ते 6 दिवसापासून तुटून पडली होती. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र, विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्याला आपले जीव गमवावे लागले आहे.
advertisement
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
महावितरणच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी अनेक हकनाक बळी गेले आहेत. तरीही प्रशासनाचे डोळे उघडल्याचे दिसत नाही. आज या घटनेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. जर वेळीच विजेच्या तारा दुरुस्त केल्या असत्या तर हे जीव नक्कीच वाचले असते. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.
वाचा - Nanded Crime : आधी पलंगावर पत्नीचा गळा आवळला; नंतर स्वतः उचललं धक्कादायक पाऊल, नांदेड हादरलं
यापूर्वीही अशाच घटनेत चोघांचा मृत्यू
तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील गिरधारी साठवणे यांचे विहिरीत असलेली मोटार पाण्याने बुडून जाण्याची शक्यता असल्यामुळे ही मोटर काढण्याकरता त्यांचा मुलगा खेमराज गिरधारी साठवणे (वय 50), प्रकाश भोगाडे (वय 50), सचिन यशवंत भोंगाडे (वय 30), महेंद्र राऊत (वय 28) वर्षे हे विहिरीत उतरले असता त्यांना विजेचा धक्का लागून एकावर एक खाली पडून चौघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडली.
