एका सराईत गुन्हेगाराने अशाप्रकारे व्हिडीओ जारी करत धमकी दिल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. हा प्रकार ताजा असताना आता गोट्या गितेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्याने डीएम बॉस असा उल्लेख केला आहे. निवडणुकीच्या काळातला हा जुना व्हिडीओ असून आता पुन्हा नव्याने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गोटया गीते याने ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडीओ काढून समाज माध्यमावर पोस्ट केला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने डीएम बॉस असा उल्लेख केला आहे. यात तो अजित पवार गटाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नावासमोरील बटण दाबताना दिसत आहे. एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेच्या भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र गित्ते साठी परळीत वेगळा नियम आहे का? त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं का नाही, असे सवाल उपस्थित होत आहेत.
खरं तर, मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास काही ठिकाणी बंदी असते. तर मोबाईल सोबत असेल तर त्यातून चित्रण करता येत नाही, असं असताना गोट्या गितेनं हा व्हिडिओ काढून लगेच पोस्ट केला. यामुळे आता परळीत अशाच पद्धतीने गुंडागिरी करून मतदान झाले का? असाही सव्वाल उपस्थित होत आहे..