यातून गोट्या गितेचा गुन्हेगारी इतिहास समोर येत आहे. गोट्या गिते हा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा खास मानला जातो. मात्र त्याचा गुन्हेगारी इतिहास हा वाल्मीक कराडपेक्षा भयंकर असल्याचं समोर आलं आहे. गोट्या गितेवर तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात हाफ मर्डरसह दरोडे, चोरी खंडणीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
advertisement
गोट्या गितेचा गुन्हेगारी इतिहास
दोन टोपण नावे आणि गुन्हेगारीचा काळा इतिहास असलेल्या गोट्या गित्तेवर हाफ मर्डर, दरोड्यासारखे तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने बीड जिल्ह्यात परळी, अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह इतर पाच जिल्ह्यात जावून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असणारा गोट्या ऊर्फ ज्ञानोबा ऊर्फ ग्यानबा मारुती गित्ते कुख्यात दरोडेखोर आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित आरोपी म्हणून त्याचं नाव घेतलं आहे. यानंतर गोट्या गीते चर्चेत आला. परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणावेळी गोट्या हजर होता. बीड पोलिसांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई केली. यातही तो फरार आहे.
गोट्यावर कोण कोणते गुन्हे दाखल
- दरोडा/दरोड्याचा प्रयत्न - ७
- दरोडा आणि खुनाचा प्रयत्न - १
- जबरी चोरी/चोरी - २५
- खुनाचा प्रयत्न - ५
- अपहरण - १
- खंडणी - २
- शासकीय अधिकाऱ्याच्या कामात अडथळा - १
- इतर गुन्हे - १
कोणत्या जिल्ह्यात किती गुन्हे
- बीड जिल्हा : २५ गुन्हे
- पुणे जिल्हा : ९ गुन्हे
- लातूर जिल्हा: ३ गुन्हे
- परभणी जिल्हा: २ गुन्हे
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा : १ गुन्हा
- इतर : ३ गुन्हे
