सोलापूर: बीडमधील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गेआत्महत्या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होते. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. पोलिसांनी तिच्या बँक खात्यात किती पैसे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे. यासाठी आता पूजाचा पोलीस कोठडीत आणखी २ दिवस मुक्काम वाढला आहे.
advertisement
9 सप्टेंबर रोजी गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. गोविंद बर्गे यांना दबावात आणल्यामुळे आत्महत्या केल्याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली होती. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी पूजा गायकवाडची पोलीस कोठडी आज शनिवारी संपली होती. त्यामुळे पुन्हा तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
कोर्टात काय घडलं?
पोलिसांनी पूजा गायकवाडने अजून एक खरेदी-विक्रीचा दस्त सांगितला आहे, तो मिळवण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. त्या दिवशी बर्गे यांनी पूजाला फोन केले होते. त्या दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग यातून काय काय तपास होऊ शकतो, या संदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता. पूजा गायकवाड आणि इतर जे बँक खाते आहे, त्याच्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.
कोर्टात काय घडलं?
- पूजा गायकवाडचा सीडी आर काढणं, आणि त्याचं विश्लेषण करणे
- बँक स्टेटमेंटकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार
- पूजा गायकवाड हिने अजून गोविंद बर्गे सारखं कुणाला फसवलं आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.
- गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली, ते पिस्तूल गोविंद बर्गेंचं नसल्याचं आलं समोर
- गोविंद बर्गे यांच्या नावावर पिस्तूल नसल्याचं तपासात समोर. सदर पिस्तूल हे दुसऱ्याकडून खरेदी करून पोलीस तपासात समोर
- या पिस्तुलीचा त्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू
पूजाला २ दिवसांची पोलीस कोठडी
कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्या पुढील तपासासाठी वैराग पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे आता पोलीस आता पूजाने किती संपत्ती जमवली, बर्गे यांच्याशी फोनवर काय बोलली, चॅट काय होतं, याची तपासणी करणार आहे.