TRENDING:

Pooja Gaikwad: गोविंद तर तिच्यासाठी कस्टमर, कातील पूजाची कुंडली आली समोर, अशी झाली सुरुवात

Last Updated:

आता बर्गेंच्या आत्महत्येला पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकला जबाबदार धरलं जात आहे. पण, पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे भयानक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : कलेच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटारूंचे अड्डे मराठवाड्यात नवीन नाही. खास करून धाराशिव, बीड, सोलापूर या पट्यामध्ये अशा कला केंद्रांना ऊत आला आहे. अशाच एका कला केंद्रावर जाऊन बीड येथील माजी सरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांनी आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि नर्तिकेच्या नादापायी आत्महत्या केली. आता बर्गेंच्या आत्महत्येला पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकला जबाबदार धरलं जात आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं आहे. पण, पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे भयानक आहे.
News18
News18
advertisement

पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्याती बार्शी येथील पारगावातील एका कला केंद्रात काम करते. हे कला केंद्र म्हणजे, इथं अनेक हौशे आणि धनदाड्यांची गर्दी असते. इथं पार्ट्या भरवून पूजा गायकवाड सारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खूश करतात. याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे. पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे, गोविंद बर्गे हे विवाहित होते. पण, तरीही कला केंद्रात जाऊन पूजावर त्यांनी पैसे उधळत होते. नुसते पैसे उधळले नाहीतर तिला सोनं, नातेवाईकांना जमिनी सुद्धा खरेदी करून दिल्या. जेव्हा तिने घर नावावर करून देण्याची मागणी केली, तेव्हा वाद विकोपाला गेला.

advertisement

' .

पूजा गायकवाड नेमकी आली कुठून?

पूजा गायकवाड मुळात एक नर्तिका आहे. ती आधी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुप्रसिद्ध असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी कला केंद्र हे सुरुवातील बेकायदेशीररित्या उभारलेलं होतं. त्यामुळे या भागातील १५ ते २० गावातील लोकांनी वेळोवेळी आंदोलनं करून हे कला केंद्र बंद करावे अशी मागणी केली होती. या कला केंद्रामध्ये दिवस रात्र नाचगाण्याच्या पार्ट्या होत होत्या. एवढंच नाहीतर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं इथं आयोजन होत होतं. या कला केंद्रामध्ये नेहमी गर्दी राहत होती. कित्येक वेळा इथं मारामारीच्या घटनाही घडल्या. धक्कादायक म्हणजे, इथं आलेल्या ग्राहकांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले गेल्याचे प्रकारही घडले आहे.

advertisement

लोकांनी कुलस्वामिनी केंद्रावर केली होती दगडफेक

१९ जून २०२४ रोजी कला केंद्राचं बांधकाम सुरू असल्यामुळे लोकांनी विरोध केला होता. पण कला केंद्रात डीजे लावून नर्तिका नाचवल्या जात होत्या. या प्रकारामुळे गावकरी संतापले आणि त्यांनी कला केंद्रावर तुफान दगडफेक केली होती. यामध्ये कला केंद्राच्या परिसरात असलेल्या गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. गावकऱ्यांनी हे कला केंद्र बंद करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही केलं होतं. पण हे कला केंद्र तसंच सुरू आहे.

advertisement

पूजा गायकवाडला कुलस्वामिनीमध्ये मिळालं बाळकडू

पूजा गायकवाड याच कुलस्वामिनी कला केंद्रात नर्तिका होती. तिची सुरुवात याच कुलस्वामिनी कला केंद्रात झाल्याची माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं. याचं बाळकडू पूजाला इथं मिळालं.

पूजाने पोलिसांना दिली गोविंदबद्दल संबंधाची कबुली

गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. पण, आता तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत एक धक्कादायक कबुली दिली आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना कबुली दिली आहे.

advertisement

गोविंदच्या आत्महत्येवेळी पूजा कुठे होती?

गोविंद बर्गे यांनी पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी पोहोचला होता. तिथे नसल्यामुळे कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे. त्यावेळी पारगाव येथील कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आला होता. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pooja Gaikwad: गोविंद तर तिच्यासाठी कस्टमर, कातील पूजाची कुंडली आली समोर, अशी झाली सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल