TRENDING:

Yavatmal News: ग्रामपंचायत फोडली, कागदपत्रं जाळली; ग्रामसभेपूर्वीच 'या' गावात उघडकीस आला कांड!

Last Updated:

Yavatmal News: पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायचीचं कार्यालय फोडून महत्त्वाची कागदपत्रं जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचार...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायचीचं कार्यालय फोडून महत्त्वाची कागदपत्रं जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडे या घटनेची तक्रार देण्यात आली असून प्रकरणाची तपासणी सुरू आहे.
Yavatmal News
Yavatmal News
advertisement

योजनांमध्ये झाला होता भ्रष्टाचार

समोर आलेल्या माहितीनुसार सायखेड्यातील गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणाता विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा तक्रारी दिलेल्या होत्या. मात्र तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती.

श्वान पथकाच्या मदतीने शोध सुरू

या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. दस्ताऐवज जाळल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी तपास सुरू केला असून श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमधील ही महत्त्वाची कागदपत्र कोणी आणि कशासाठी जाळली, याचा शोध पोलीस घेत आहे.

advertisement

हे ही वाचा : 15 वर्षांच्या मुलाकडून 14 वर्षांची मुलगी 8 महिन्यांची गरोदर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
35 वर्षांपासून जपलाय वारसा, मुंबईतील प्रसिद्ध वडापाव, 20 रुपयांत मन होईल तृप्त
सर्व पहा

हे ही वाचा : कोल्हापूरात 'औषध' प्रशासनाचा मोठा दणका; मेडिकल स्टोअर्सवर थेट कारवाई, 'इतकी' दुकानं कायमची बंद, विक्रेत्यांमध्ये खळबळ!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yavatmal News: ग्रामपंचायत फोडली, कागदपत्रं जाळली; ग्रामसभेपूर्वीच 'या' गावात उघडकीस आला कांड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल