कोल्हापूरात 'औषध' प्रशासनाचा मोठा दणका; मेडिकल स्टोअर्सवर थेट कारवाई, 'इतकी' दुकानं कायमची बंद, विक्रेत्यांमध्ये खळबळ!
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने गैरप्रकार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांवर थेट कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 35 औषध दुकानांवर कारवाई झालेली आहे. त्यातील...
कोल्हापूर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने गैरप्रकार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांवर थेट कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 35 औषध दुकानांवर कारवाई झालेली आहे. त्यातील 19 विक्रेत्यांचे परवाने रद्द केलेले आहेत, तर 16 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. विविध प्रकारची अनियमितता आणि कायद्याचे उल्लंघन अशी कारणं देत अन्न व औषध प्रशासन विभागाने ही धडक कारवाई केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
या कारणांमुळे औषध दुकानांचे परवाने रद्द
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी औषध दुकानांची तपासणी सुरू होती. मागील 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या या तपासणीत अनेक औषधांच्या दुकानांमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली आहे. बनावट आणि कालबाह्य औषधांची साठवणूक करणे, परवानाधारकांऐवजी इतर व्यक्तीकडून दुकान चालविणे, औषध खरेदी-विक्रीत तफावत असणे, बिले आणि इतर नोंदी न ठेवणे आणि दुकान बंद असतानाही माहिती न देणे, अशाप्रकारच्या विविध कारणांमुळे विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
advertisement
30 दिवसांच्या मुदतीनंतर केली कारवाई
जिल्ह्यातील औषध दुकानांवर कारवाई करण्यापूर्वी विभागाच्या सहायक आयुक्तांकडून संबंधित औषध दुकानांना नोटीस देण्यात आली होती. त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. त्यानंतर सुनावणी घेत औषध दुकानांचे परवाने रद्द आणि निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इतर औषध दुकानांचे धाबे दणाणले आहेत.
advertisement
संपूर्ण जिल्ह्यातील 35 औषध दुकानांवर कारवाई
संभाजीनगर, अंबाबाई मंदिर परिसर, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात असणाऱ्या 35 औषध दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, औषधे खरेदी करताना बिल घ्यावे, औषधांची तारीख तपासावी, दुकानांत गैरप्रकार दिसल्यास त्याची माहिती विभागाला त्वरित कळवावी.
advertisement
हे ही वाचा : Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकणार, मंत्रालयात हालचालींना वेग, समोर आली अपडेट...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूरात 'औषध' प्रशासनाचा मोठा दणका; मेडिकल स्टोअर्सवर थेट कारवाई, 'इतकी' दुकानं कायमची बंद, विक्रेत्यांमध्ये खळबळ!


