15 वर्षांच्या मुलाकडून 14 वर्षांची मुलगी 8 महिन्यांची गरोदर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Pune Crime: पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एक १४ वर्षीय शाळकरी मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आहे.

AI generated Photo
AI generated Photo
पुणे: पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एक १४ वर्षीय शाळकरी मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आहे. ही मुलगी एक दोन नव्हे तर तब्बल ८ महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं आहे. १५ वर्षीय आपल्या मित्रासोबत ठेवलेल्या लैंगिक संबंधातून ही मुलगी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी १५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा मागील दोन वर्षांपासून मित्र आहेत. या दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून शारीरिक संबंध होते. आरोपीने अनेकदा मुलीला एका महिलेच्या घरी घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. रविवारी संबंधित मुलीची प्रकृती अचानक बिघडली. ती चक्कर येऊन खाली पडली.
मुलीला बरं वाटत नसल्याने मुलीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
15 वर्षांच्या मुलाकडून 14 वर्षांची मुलगी 8 महिन्यांची गरोदर; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement