गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, "त्यांनी काय वक्तव्य केले, हे मी पाहिले नाही. मात्र कुठलंही वक्तव्य करत असताना माझ्या समवेत सर्वांनी पथ्य पाळले पाहिजे. कुणाचे मन दुखावेल, असं वक्तव्य करण्यास अर्थ नाही. शरद पवार असो वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य करत असताना प्रत्येकांनी सांभाळून करावे, अशी अपेक्षा आहे."
advertisement
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी ओबीसी महारॅलीवर देखील प्रतिक्रिया दिली. ओबीसी समाजाने मराठा समाजाला कुणबी सर्टीफिकेट देऊ नये, असं कुठेही म्हटलं नाही. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी सर्टीफिकेट द्यावेत. मात्र ओबीसींचे आरक्षण आहे, ते कमी करू नये. एवढी ओबीसींची अपेक्षा आहे, असंही पाटील म्हणाले.
जळगावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बोलताना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील 25 नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या असून यात शेकडो पशुधन वाहून गेले आहे. तर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी शेती खरडून निघाल्या आहेत. त्याला वेगळी मदत मिळावी, तसेच ज्या ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आम्ही कॅबिनेट बैठकीत करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी वेगळा पॅकेज मिळावं अशी ही आमची मागणी राहणार आहे. जास्त नुकसान झालेल्या भागात तातडीची मदत देणे सुरू झाले आहे.