TRENDING:

माणूस धर्माचं दर्शन! हिंदू कुटुंबाच्या घरातून निघाला मुस्लिम कारागिराचा जनाजा, कारण ऐकून कराल कौतुक

Last Updated:

त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या घरात गेले आहे. म्हणून त्यांची मुस्लिम धर्म पद्धतीने का असेना त्यांची अंतयात्रा अर्थात जनाजा आमच्या घरापासून काढावा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इम्तियाज अली, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेहमीप्रमाणे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तसंच, हिंदू मुस्लिम वादही उकारून काढला जात आहे. पण, असे वाद तयार करणाऱ्या नेते मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना जळगावमध्ये घडली आहे. एका  हिंदू कुटुंबात ८० वर्ष राहिलेल्या मुस्लिम बांधवांचा वयाच्या १०० व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर आता या हिंदू परिवाराच्या घरून या व्यक्तीचा जनाजा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थितीत होते.

advertisement

जळगाव जिल्ह्यातील यावल इथं राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. जळगावच्या यावल शहरातील बारी वाडा भागात देवरे -सोनार कुटुंबाकडे मुस्लिम समाजातील वृद्ध गेल्या ८० वर्षांपासून सराफा कारागीर म्हणून काम करत होते. त्यांचे पूर्ण आयुष्यचे देवरे –सोनार कुटुंबाकडेच निघाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. दरम्यान, मुस्लिम समाजातील या वृद्धाला आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवणाऱ्या हिंदू कुटुंबांनी त्यांचा अंत्यविधी आज करण्याचा निर्णय घेतला असून मुस्लिम धर्म पद्धतीने त्यांचा जनाजा हिंदू परिवाराच्या घरातून काढण्यात आला. ही घटना राष्ट्रीय एकात्मतेची दर्शन घडवणारी आहे.

advertisement

वयाच्या २० वर्षांपासून देवरे कुटुंबाकडे कामाला

यावल शहरात अशोक देवरे -सोनार, ज्योती देवरे -सोनार, ऋषी देवरे-सोनार या कुटुंबाकडे कय्युम खान नुर खान राहत होते. त्यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. कय्युम खान हे वयाच्या 20 वर्षाचे असताना  सराफ कारागीर म्हणून त्यांच्याकडे कामाला आले होते. ८० वर्षांपासून सदर कय्युम खान हे हे देवरे कुटुंबाशी एकनिष्ठ  होऊन राहिले आणि तिथेचं ते काम करून त्यांच्या कुटुंबासह राहत होते.  दरम्यान, वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.

advertisement

देवरे कुटुंबाने केली विनंती

कय्यूम खान हे शहरातील काजीपुरा भागातील मूळचे रहिवासी असून ते मुस्लिम समाजाचे असल्याने त्यांच्यावर मुस्लिम धर्मपद्धती नुसार अंत्यविधी करण्याची तयारी खान कुटुंबाकडून करण्यात आली. मात्र, देवरे - सोनार कुटुंबाने विनंती केली की, त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या घरात गेले आहे. म्हणून त्यांची मुस्लिम धर्म पद्धतीने का असेना त्यांची अंतयात्रा अर्थात जनाजा आमच्या घरापासून काढावा तसंच त्यांचा अंतिम दर्शन घेण्यासाठी पुणे आणि मुंबई येथे देवरे-सोनार कुटुंबाची मुलं, मुली, जावई हे येणार असून आम्हाला एक दिवसाचा अवधी द्यावा अशी विनंती केली. त्यांच्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

देवरे –सोनार यांच्या घरापासूनच अंतयात्रा अर्थात जनाजा काढण्यात येणार आहे. या घटनेमुळे शहरात एका प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडलं आहे. मयत कय्यूम खान यांच्या पश्चात दोन पुतणे यात शिक्षक सादिक खान शाकीर खान आणि जाकीर खान शाकीर खान हे आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माणूस धर्माचं दर्शन! हिंदू कुटुंबाच्या घरातून निघाला मुस्लिम कारागिराचा जनाजा, कारण ऐकून कराल कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल