TRENDING:

Hingoli : हिंगोलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावरच्या गोळीबारानंतर मोठ्या घडामोडी, डॉक्टरकडून आरोपी जखमी

Last Updated:

हिंगोली जिल्ह्यात एकाच आठवड्यात गंभीर गुन्ह्याच्या घटना घडल्या आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कारवाया केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनिष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 13 ऑगस्ट : हिंगोली जिल्ह्यात एकाच आठवड्यात गंभीर गुन्ह्याच्या घटना घडल्या आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कारवाया केल्या आहेत. वनविभागाचा कार्यालयीन अधीक्षक अरुण पवार याला पंधरा हजार रुपयांची लाज स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. दुसरीकडे वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला घरकुल बांधकामाचा तिसरा आता काढण्यासाठी लाभार्थ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन विभागाने पकडलं, त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कुणीही शासकीय अधिकारी कर्मचारी खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करण्याचे आवाहन हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
हिंगोलीत गोळीबारात भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष जखमी
हिंगोलीत गोळीबारात भाजप युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष जखमी
advertisement

भाजपचा शिवसेनेविरुद्ध मोर्चा

हिंगोलीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जिल्हा परिषद आवारात भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. परंतु माझ्यावर झालेला हल्ला हा आमदार संतोष बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून झाला, असा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला होता.

advertisement

Jalgao : एकाच आठवड्यात सात अल्पवयीन मुलींवर अत्याचार, जळगाव हादरलं

या गोळीबार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात पप्पू चव्हाण समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पोलीस प्रशासन आणि आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चानंतर मोर्चात सहभागी काही जणाविरुद्ध पोलिसांप्रती अपप्रितीची भावना प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

advertisement

दोन आरोपी ताब्यात

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर पिस्तुलाच्या साह्याने गोळीबार झाला होता. या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी अक्षय इंदूरिया आणि ओम पवार हे फरार झाले होते. या फरार आरोपींचा शोध पोलीस घेत होते. त्यांची माहिती देणाऱ्यांना पोलीस विभागाने 25,000 रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं होतं. अखेर सोमवारी 7 ऑगस्टच्या रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने पुणे जिल्ह्यातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

advertisement

छ. संभाजीनगरमध्ये 7 दिवसात दोनदा गोळीबार, बापाकडून मुलीवर अत्याचाराचीही घटना

आरोपीला भूल देऊन जखमी केलं, डॉक्टरवर गुन्हा

हिंगोलीतील एका डॉक्टरने परस्परविरोधी गुन्ह्यासाठी जखमी दाखवण्याकरता एका तरूणाला भूल देऊन जखम करून खोटा पुरावा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासादरम्यान उघड झाला आहे. हिंगोलीतील पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणातील आरोपी सत्यम देशमुखच्या फिर्यादीवरून डॉ. श्रीनिवास कंदी व त्यांच्या सहकाऱ्याविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

advertisement

युरिया-बियाणांची चढ्या दराने विक्री, दोघांचे परवाने रद्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात युरिया खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील कृषी केंद्र चालक युरिया खताची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करत असल्याचे समोर आले होते. या कृषी केंद्र चालकाचा खत विक्रीचा परवाना कृषी विभागाने कायमस्वरूपी रद्द केला. त्याचबरोबर कपाशीचे बियाणे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी वसमत येथील कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना एका वर्षा साठी रद्द केला आहे. मात्र यानंतरही युरिया खत अनेक ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli : हिंगोलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावरच्या गोळीबारानंतर मोठ्या घडामोडी, डॉक्टरकडून आरोपी जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल